Kasarwadi Crime News : सँडविक एशिया कंपनीत सव्वाचार लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील सँडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. कंपनीमधून सव्वाचार लाख रुपये किमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले आहेत. हा प्रकार 21 मे ते 25 मे या कालावधीत घडला असून याबाबत सात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक चंद्रकांत खेडेकर (वय 28, रा. उरुळी कांचन, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडेकर हे सॅंडविक एशिया कंपनीत नोकरी करतात. कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले 4 लाख 25 हजार 447 रुपये किमतीचे स्पेअर पार्टचे तीन बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादी यांनी त्या बॉक्सचा सर्वत्र शोध घेतला. मात्र स्पेअर पार्टचे बॉक्स मिळून आले नाहीत. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.