Kasarwadi fraud : कासारवाडी येथे विकासकाची एक कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज : एकाच जागेचा दोन वेळा विकसन करारनामा करून पहिल्या विकासकाकडून एक कोटी पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. (Kasarwadi fraud) ही घटना सन 2003 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत कासारवाडी येथे घडली.

महेश अमरसी सपारिया (रा. दवाबाजार, चिंचवड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान खंडू चव्हाण (वय 90, रा. कासारवाडी), किशोर विष्णू चव्हाण (वय 58, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahavitaran appeal : नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत कासारवाडी येथील एका जागेचा सन 2003 मध्ये विकसन करारनामा केला. सन 2018 पर्यंत त्यांनी फिर्यादी कडून हक्कसोड, वाटणीपत्र, भाड्यासाठी वेळोवेळी एक कोटी पाच लाख 69 हजार 108 रुपये घेतले.(Kasarwadi fraud) फिर्यादी सोबत विकसन करारनामा झालेला असतानाही आरोपींनी सन 2017 साली स्काय लाईन डेव्हलपर्स यांच्याशी पुन्हा विकसन करारनामा व खरेदीखत केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.