Kasarwadi Fire : कासारवाडी येथे पुणे-नाशिक हायवेवर कारला लागली आग

एमपीसी न्यूज : कासारवाडी (Kasarwadi Fire) येथे आज सकाळी पुणे नाशिक हायवेवर कारला आग लागली होती. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने दिली आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता कासरवाडी येथील नाशिक फाटा चौकाजवळ एका कारला आग लागली होती. ही कार पुण्याला जात असताना अचानक आग लागली. ही कार चौकाजवळ पोहोचली तेव्हा आग लागली होती. एक अग्निशमन बंब पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी थोड्या वेळातच ही (Kasarwadi Fire) आग विझवली. या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.