Kasarwadi : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पंक्चरचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज – शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पंक्चरचे दुकान जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी कुंदननगर येथे पन्ना ताडपत्रीजवळ सिद्धार्थ बनसोडे यांचे पंक्चरचे दुकान आहे. शुक्रवारी सव्वाएकच्या सुमारास दुकानात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाले. यामुळे दुकानातील सामानाने पेट घेतला. दुकानात पंक्चरचे साहित्य, नवीन-जुने टायर आणि अन्य माल होता. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.