BNR-HDR-TOP-Mobile

Kasarwadi : भंगाराची दोन दुकाने जळून खाक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथे लागलेल्या आगीत भंगार वस्तूंची दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी रात्री कासारवाडी येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील रेल्वे गेटजवळ असलेल्या भंगाराच्या दोन दुकानांना आग लागल्याची वर्दी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार भोसरी, रहाटणी यांचा प्रत्येकी एक आणि पिंपरी मुख्य अग्निशामक केंद्राचे दोन असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

HB_POST_END_FTR-A2

.