Kasarwadi : फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने फ्लॅटला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – फ्रीज कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने फ्लॅटला आग लागली. ही घटना कासारवाडी येथील सागर हाईट्स इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर रविवारी (दि. 19) पहाटे पावणेदोनच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सागर हाईट्स इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर एका फ्लॅटमधील फ्रीज कॉम्प्रेसर मधून गॅस लिकेज झाला. यामुळे फ्लॅटमधील किचनमध्ये पहाटे पावणेदोनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील सर्वजण बाहेर सुरक्षित ठिकाणी आले. इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवली नसल्याने अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.

  • विनायक दास यांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी विभागाचे दोन बंब आणि एक देवदूत वाहन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

इमारतीपर्यंत अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे काही अंतरावर 15 होज पाईप लावून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. फ्लॅटमध्ये किचन मध्यभागी आहे. वेळीच सर्वजण बाहेर पडल्याने मोठा धोका टळला. किचनमध्ये आगीचा भडका उडाल्याने आग पसरली. त्यावेळी बेडरूममधून बाहेर पडणे शक्य नव्हते. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले.

  • घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, किचन मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, फायरमन लक्ष्मण ओवाळे, अमोल चिपळूणकर, बाळकृष्ण भोजने, कैलास डोंगरे, मोहन चव्हाण, महेश चौधरी, वाहन चालक देवा जाधव, प्रमोद जाधव, शंकर ढाकणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.