Kasarwadi : जबरदस्तीने घराबाहेर काढत दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – मंदिराची जागा माझी असल्याचे सांगत महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच महिलेच्या लहान भावाला लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी दोन वाजता जैन मंदिर, कासारवाडी येथे घडली.

प्रिन्स ललित शर्मा (वय 19, रा. मनीमंगल सोसायटी, जैन मंदिर, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत परशुराम चव्हाण (वय 52, रा. कासारवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसून ‘ही मंदिराची जागा माझी आहे, त्यामुळे तुम्ही सर्व इथून निघून जा. नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला मारहाण केली.

त्यावेळी फिर्यादी आरोपीला अडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.