Kasarwadi : माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील माजी नगरसेवक सोपानराव लोंढे यांचे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सोपानराव लोंढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत कासारवाडी येथून 1992 ते 1997 या कालावधीत निवडून आले होते. तसेच 2002  ते 2007  या कालावधीत असे एकूण दहा वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले.  शिवाय महापालिका शिक्षण मंडळावर उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.

त्यांचा अंत्यविधी आज, बुधवारी (दि. 20) दुपारी चार वाजता कासारवाडी येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.