Kasarwadi : पथनाट्यातून दिला मतदान जागृती आणि पाणी बचतीचा संदेश

एमपीसी न्यूज- मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य असून पाणी बचत सर्वांची जबाबदारी आहे असा संदेश पथनाट्याद्वारे देण्यात आला. दिलासा संस्थेच्या वतीने कासारवाडी येथील सितांगण बागेत हे पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, साहित्यिक श्रीकांत चौगुले, अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव तसेच प्रा तुकाराम पाटील, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सविता इंगळे, शोभा जोशी,शाम सरकाळे, देवेंद्र गावंडे, विजय चौधरी, भाग्यश्री कंक, गोरख चव्हाण, वसंत लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सितांगण बागेत जनजागृती फेरी काढण्यात आली. या पथनाट्यात दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाश घोरपडे, वैशाली चौधरी, मधुश्री ओव्हाळ, अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, उमेश सणस, फुलवंती जगताप यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रकाश रोकडे म्हणाले, ” भारतीय राज्यघटनेतील ” आम्ही भारतीय” हा शब्द कृतीत आणला तर खूप मोठे बदल होतील. लोकशाही रक्षणासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे”

“वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होतील. यासाठी पाणी जपून वापरावे”असे मत श्रीकांत चौगुले यांनी व्यक्त केले. नागरिकांनी पाणी बचत करावी अन मतदानाचा हक्क बजवावा असे नितीन यादव यांनी आवाहन केले.

जयश्री गुमास्ते, मीरा कंक, संगीता चव्हाण यांनी संयोजन केले. सूत्रसंचलन प्रदीप गांधलीकर यांनी केले. आभार निशिकांत गुमास्ते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.