_MPC_DIR_MPU_III

Kasarwadi : नाशिक फाट्यावर मेट्रो स्टेशनचे काम सुरु; वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथे नाशिक फाट्यावर भोसरी मेट्रो स्थानकाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे नाशिक फाट्यावरील पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा उड्डाणपुलावरून पिंपरीच्या दिशेने जाणारा डाऊन रॅम्प वाहतुकीसाठी भोसरी मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांनी पुलावरून सरळ पुढे जाऊन सीआयआरटी समोरून ‘यु टर्न’ घेऊन पुन्हा नाशिक फाट्यावर येऊन पिंपरीच्या दिशेने जावे.

  • नाशिक फाटा ते कासारवाडी रेल्वे स्टेशन (इंडियन ऑइल पेट्रोल पंप) या दरम्यानचा रस्ता रात्री अकरा ते पहाटे पाच या कालावधीत सेवा रस्ता अथवा ग्रेड सेपरेटर दोन्हीपैकी एक मार्ग पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येणा-या वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
_MPC_DIR_MPU_II

या मार्गावरील वाहनांनी नाशिक फाट्यावरून पिंपरीच्या दिशेने 320 मीटर अंतरापर्यंत विरुद्ध बाजूने जावे. त्यानंतर डाव्या बाजूने आऊटमधून बाहेर पडून मूळ रस्त्यावरून जावे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.