Kasarwadi News: भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बूथ सक्षमीकरण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी आज (मंगळवारी) कासारवाडी, संत तुकारामनगर, फुलेनगर, लांडेवाडी भागातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भाजप नगरसेविका सुजाता पालांडे, भाजपा उपाध्यक्ष तथा बूथ अभियान प्रमुख प्रकाश जवळकर, चिटणीस देवदत्त लांडे, पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शक्ती केंद्रप्रमुख शीतल कुंभार, मंगेश घाडगे, विश्वास पारवे, शरण बसवेश्वर शिंगे, पांडूरंग दातीर पाटील , बूथ प्रमुख निलेश अष्टेकर, पंकज वेंगुर्लेकर, अभिषेक पोथरकर, स्वप्नील वाजे आदी भाजपा कार्यकर्ते होते.

भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण शहरात बुथ सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सोमवार, मंगळवारी पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 20, संत तुकाराम नगर,कासारवाडीमधील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख तथा महत्त्वाचे कार्यकर्ते यांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली. पक्ष वाढीसाठी चालू असलेले काम या संबंधात सविस्तर चर्चा केली.

संत तुकाराम नगर, लांडेवाडी, महात्मा फुलेनगर या परिसरात घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे. कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ मिळत आहे. कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्तपणे स्वागत केले जात आहे. शहरात पक्षसंघटन वाढवत असल्याचे गोरखे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.