Kasarwadi News : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्धा डॉक्टरांचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. निलेश भंडारी, डॉ. कविता भंडारी, डॉ. पांडुरंग लांडगे, डॉ. महेश शेटे, डॉ. विजय कुमार राऊत यांना आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका आशा शेंडगे, एकनाथ मोटे, किरण मोटे, जितेंद्र लांडगे, सीमा गावडे, देवदत्त लांडे, विलास पगारिया, बाळासाहेब जवळकर, गणेश जवळकर, मेहबूब इनामदार, आप्पासाहेब धावडे व सुरेश गदिया आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार महेश लांडगे असे म्हणाले की, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे. कासारवाडीतील व्यापारी संघटना आणि ग्रामस्थांनी हा उपक्रम राबविला याबाबत मी त्यांचे आभार मानतो.

कोरोनाचा काळ आणखी बिकट होत असून मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक कुमार पगारिया होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानासाहेब डवरी, जगदिश परदेशी, गोपीशेठ पारख, मयुर मुथा, करण मुथा व रविंद्र जगदाळे यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक भाजपचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रकाश जवळकर यांनी केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास लांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.