Kasarwadi News : पवना नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृत भराव टाकणा-या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या पात्रालगत निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृतपणे मुरूमाचा भराव टाकण्यात आला. भराव हटवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने संबंधित लोकांना नोटिस बजावण्यात आली मात्र, अद्याप भराव हटवला नसल्याने अखेर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वखारे व संबंधित इतर आठ जण ( रा. वरूण हाॅटेल जवळ, कासारवाडी ) यांच्या विरोधात शुक्रवारी (दि.4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता राजेंद्र वसंतराव डुंबरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वखारे व संबंधित इतर आठ जणांनी पवना नदीच्या पात्रालगत निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृतपणे मुरूमाचा भराव टाकला. याप्रकरणी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भराव हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावून देखील हा भराव हटवला नाही व आदेश पालन न केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.