_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Kasarwadi News: नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. मात्र, या कायद्यांबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने लग्न करावे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

कासारवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिथे जास्त पैसे मिळतील, तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. इतकेच सध्याच्या केंद्रीय कृषी कायद्यात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही. शेतकरी आहेत म्हणूनच आम्हाला खायला मिळत आहे, याची आम्हाला कल्पना आहे.

राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करतात. देशातील सर्व शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. देशातील मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नसल्याचे आठवले म्हणाले.

‘हम दो, हमारे दो’ हा नारा राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने लग्न करावे, असेही आठवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.