Kasarwadi News: धावपळीच्या युगात मन:शांती महत्वाची – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – धावपळीच्या युगात मन:शांती महत्वाची असते. समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या ध्यानकेंद्राचा परिसरातील नागरिकांना ताणतणाव दूर करण्यासाठी उपयोग होईल, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 कासारवाडी येथील नव्याने विकसित झालेल्या ध्यानकेंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन बांधण्यात येणा-या भाजीमंडईचा भूमिपूजनाचा कार्यक्रम महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

_MPC_DIR_MPU_II

उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, माऊली थोरात, नगरसदस्या आशा शेंडगे, स्वाती काटे, ह क्षेत्रीय अधिकारी हराळे, सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कासारवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या भाजी मंडईचे क्षेत्रफळ 1130 चौरस फूट असून त्यामध्ये तीन मजले करण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर मंडई व पार्किंग, तर दुस-या मजल्यावर बहुउद्देशीय हॉल आणि तिस-या मजल्यावर मेझेनेन फ्लोअर करण्यात येणार आहे.

या कामासाठी 2 कोटी 47 लाख इतका खर्च येणार आहे. तर, कासारवाडी येथील लोकार्पण झालेल्या ध्यानकेंद्राचा हॉल 322 चौरस मीटरचा असून याकामासाठी 74 लाख 62 हजार इतका खर्च आलेला आहे. याच्या बाजूस योगा इत्यादी उपक्रमासाठी मोकळी जागा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.