Kasarwadi News : बँक खात्याची केवायसी चा बहाणा करत खाते केले रिकामे

एमपीसी न्यूज – बँक खात्याची केवायसी पेंडिंग आहे म्हणत मोबाईल नंबर द्वारे एकाने नागरिकाच्या बँक खात्यातून 1 लाख 99 हजार रुपये काढून घेतले आहेत. हि फसणूक 2 मार्च  रोजी कासारवाडी येथे ( Kasarwadi News) घडली आहे.

याप्रकरणी युसुफ जब्बार शेख (वय 37 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.3) फिर्याद दिली असून अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri News : शास्तीकर माफीचा आदेश धूळफेक; घरे नियमितीकरण महत्वाचे – विजय पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना आरोपीने एचडीएफसी बँक खात्याची केवायसी पेंडीग आहे असा खोटा मेसेज केला. त्याने केवायसीसाठी लिंक पाठवली, त्या लिंकद्वारे बँकेचे बनावट पेज ओपन झाले. त्यामध्ये फिर्यादींनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील भरताच फिर्यादीच्या खात्यातून 1 लाख 99 हजार 778 रुपये काढून घेण्यात आले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील ( Kasarwadi News) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.