Kasarwadi Tree Collapsed: कासारवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा

एमपीसी न्यूज : कासारवाडी येथे आज भर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण आला झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार कसरवाडीमधील शास्त्रीनगर भागात असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संजयकुमार सदशिव लांडगे मैदानाजवळील रस्त्यावर एक झाड पडले आहे. (Kasarwadi Tree Collapsed) त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता बंद झाला आहे.त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना व विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास अडथळा निर्माण झाला आहें.

ST Driver Heart attack: एसटीचे स्टेअरिंग हातात असतानाच चालकाला हार्ट अटॅक, अखेरच्या क्षणी 25 जणांना जीवदान

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला त्याबाबतीत आज सकाळी 6.15 वा एका जागरूक नागरिकाने कळवले. (Kasarwadi Tree Collapsed) त्यामुळे अग्निशमन विभागाचा एक अग्निशमन बंब व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. काही वेळातच ते झाड कापून पुर्ण रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.