Kasarwadi : विस्कळीत पाणीपुरवठा, सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना कोंडले

एमपीसी न्यूज – मागील पाच दिवसांपासून दापोडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतापलेल्या सत्ताधारी भाजप नगरसेविकेने पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना पाण्याच्या टाकीमधील खोलीत कोंडले आहे. आज (शनिवारी) दोन तासापासून सह शहर अभियंता, कार्यकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना कोंडले आहे.

कासारवाडी, दापोडी भागातील पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून विस्कळीत आहे. मागील पाच दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा अतिशय विस्कळीत झाला आहे. दोन दिवसांपासून तर पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पिण्यापुरते देखील पाणी नागरिकांना मिळत नाही.

त्यामुळे संतापलेल्या सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज पाण्याच्या टाकीमधील खोलीत अधिका-यांना कोंडले आहे. त्यामध्ये सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना देखील कोंडले आहे. जोपर्यंत टाकी भरत नाही. तोपर्यंत अधिका-यांना बाहेर सोडणार नाही, असे शेंडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.