Pune News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचं आम्ही पोस्टमार्टम केलं : देवेंद्र फडणवीस 

 एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले. यावेळी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल (Pune News) होणार आहेत का?असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखादी निवडणूक जिंकलो किंवा हारलो तर त्याने काही फारसा फरक पडत नाही. मात्र विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याच मुल्यमापन करतो किंवा दुसर्‍या भाषेत सांगायच झाल्यास त्याचं पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केल असून त्या योग्य आम्ही काळजी घेऊ अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

Nigdi News : ‘रानजाई’मुळे लहानपणापासूनच मुलांना निसर्गाविषयी गोडी निर्माण होईल – अभिनेत्री प्रार्थना बेहरे

मला त्याबाबत माहिती नाही  :  देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, (Pune News) मला त्याबाबत काही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती पाहण्यास मिळत असल्याच सांगत त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.

 

आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत : देवेंद्र फडणवीस 

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अद्याप पंचनामे झाले नाही.त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला.त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याची सुरवात देखील झाली आहे.

तसेच सर्वांचे पंचनामे होण्यास थोडा वेळ लागणारच आहे. एखाद्याने नुसता फोटो जरी काढला तरी आम्ही त्याला पंचनामा म्हणू, तसेच मला विरोधी पक्षाच आश्चर्य वाटते.(Pune News) आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत,आता रात्री पाऊस पडला तर ते सकाळी हंगाम करण्यास सुरुवात करतात.हे योग्य नसल्याचे सांगत महा विकास आघाडीतील नेत्यांना त्यानी सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.