Kasba Chinchwad Bye-Election Result : कसबा,चिंचवडमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार, कोण मारणार बाजी?

एपीसी न्यूज : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. (Kasba Chinchwad Bye-Election Result) या पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार? याचे चित्र आज स्पष्ट होईल. राज्यातील सर्व सत्ताधारी पक्ष व विरोधक यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. (Kasba Chinchwad Bye-Election Result) त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. तर कसबा पोटनिवडणूकीसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे.

Today’s Horoscope 02 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. (Kasba Chinchwad Bye-Election Result) चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.