Pimpri : पथारी, टपरी, स्टॉलधारकांवरील कारवाईविरोधात जेलभरो करु – नखाते

एमपीसी न्यूज – पथारी, टपरी, स्टॉलधारकांवरील कारवाई (Pimpri) विरोधात काळी फिती बांधून, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्यावतीने कृष्णानगर, चिंचवड या ठिकाणी  निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, संघटक अनिल बारवकर, बालाजी लोखंडे, राजू खंडागळे, नितीन सुरवसे, इम्तियाज पठाण, इरफान मुल्ला, शत्रुघ्न गायकवाड, नितीन काकडे, शंकर पवार, पांडुरंग शेळवणे, मीनाक्षी साळुंखे, सुग्रीव नरवटे, दत्तू चोरमले आदी उपस्थित होते.

Pune : यापुढे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने, पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका

नखाते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी कायदा झुगारून, आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरातील पथारी, हातगाडी, स्टॉल, टपरीधारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. किवळे येथील बेकायदेशीर होर्डिंग अंगावर पडून पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. (Pimpri) त्यांना सोडून फेरीवाल्यांना दोषी धरून कारवाईचे आदेश म्हणजे जखम डोक्याला आणि मलम गुडघ्याला असा प्रकार आहे.

संसदेने 2014 मध्ये कायदा केला असून, त्याची अंमलबजावणी न करता स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.