kaswardi News: सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – कोरोना कालावधीमध्ये स्वत:च्या जीवाची, संसाराची, घरातील मुलाबाळांची, वडीलधाऱ्यांची पर्वा न करता केवळ सेवाभावी वृत्तीने कोरोना योद्ध्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यामुळे आपल्यासारख्या पुरस्कार्थीला सलामच केला पाहिजे असे उद्गार आमदार महेश लांडगे यांनी काढले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने कासारवाडी येथील महापालिका दवाखान्यात डॉ. गोविंद नरके,नर्स शोभा थोरात, एम पी डब्ल्यू गणेश जवळकर, डॉ.पांडुरंग लांडगे तसेच नर्सेस, वॉर्डबॉय, आया, आशा वर्कर्स यांचा ट्रॉफी, शाल, गुलाबपुष्प देऊन आमदार लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेविका आशा शेंडगे, पवना बँकेचे संचालक जितेंद्र लांडगे, चिटणीस देवदत्त लांडे, युवा मोर्चा सरचिटणीस गणेश जवळकर, उद्योजक बाळासाहेब जवळकर, सुधीर जवळकर, उपाध्यक्ष सुनील लांडगे, संतोष टोणगे, आप्पासाहेब धावडे, बापुसाहेब भोसले, गणेश संभेराव, रघुनाथ जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर, दिगंबर शेडे, सुरेश गादिया,मुझफ्फर इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन प्रकाशतात्या जवळकर, देवदत्त लांडे, गणेश जवळकर यांनी केले.