Pune : कात्रज चाैक-सहापदरी रस्त्यासाठी १३५ काेटी – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – कात्रज चाैकातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल व नवले पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी १३५ कोटी रुपये देणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. वडगाव (नवले पूल) ते कात्रज राष्ट्रीय महामार्ग या सुमारे पावणे चार किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्याच्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनयकुमार देशपांडे आदी उपस्थित हाेते.

कात्रज चाैकाजवळच राजीव गांधी प्राणी संग्रहालय असुन, येथील प्रस्तािवत  या उड्डाणपूलावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास संग्रहालयातील प्राण्यांना होऊ नये, म्हणून साऊंड बॅरीअर्स (ध्वनीरोधक) बसवण्यात येणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
७ मीटर रुंदीचे भुयारी मार्ग  भविष्यातील गरज लक्षात घेऊन १० मीटर करण्यास मंजुरी दिली जाईल. छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा, व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवून नवी पिढी तयार व्हावी, या हेतूने आंबेगाव येथे तयार करण्यात येत असलेली शिवसृष्टी लवकरच पूर्ण होणार आहे.

पुणे-सातारा महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामे पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. मात्र, यासंदर्भात बैठक घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.