Katraj Crime News : कोयत्याने वार करुन तरुणाचा मनगटापासून पंजा तोडला ;कात्रज परिसरातील घटना

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका  तरुणांवर प्राणघातक (Katraj Crime News ) हल्ला करण्याची घटना कात्रज येथे भरदिवसा घडली.  कोयत्याने त्याच्यावर वार करुन त्याचा मनगटापासून पुढील पंजा तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला.याप्रकरणी  अभिजीत दुधनीकर (वय 23, रा. गोकुळनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी  पाचजणांसह  त्यांच्या साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुखसागर येथील स्मार्ट मेन्स पार्लरसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

 

Talewade News : डीअर पार्क नव्हे बायोडायव्हरसिटी  पार्क उभारणार

अधिक माहितीनुसार, आरोपी  व त्याचे साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याविरुद्ध फिर्यादी यांनी पूर्वी तक्रार केली होती. फिर्यादी व लाडप्पा हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना वाटेत अडविले. तुम्ही केस करता का आमच्यावर, थांबा आता तुमचा मर्डरच करतो, असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांना पकडून सपासप वार केले. फिर्यादी पळून जात असताना त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

लाडप्पा याच्यावर वार केला. तेव्हा त्याने डावा हात पुढे केला व त्यावर वार झेलला. त्यात त्याचा मनगटापासून पंजा तुटला. उजव्या हाताच्या पंजावरही वार करुन त्याला गंभीर जखमी केले. दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी लाडप्पा (Katraj Crime News ) याचा पंजा जोडला असल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.