Katraj : वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्याला उत्तरप्रदेशमधून अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज –  कात्रज (Katraj) येथील भिलारेवाडी परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बादल ऊर्फ बनवारी बिंद (वय 27 रा.प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. बादल याने पारुबाई किसन सावंत (वय 65 रा कात्रज) यांचा राहत्या घरी 11 जूनच्या मध्यरात्री खून केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत या वृद्ध असून त्या घरी एकट्याच असल्याचे हेरून आरोपीने त्यांचा गळा दाबून खून केला. यावेळी त्याने मयत यांच्या गळ्यातील व पत्र्याच्या पेटीतील दागीने चोरून नेले. पोलिसांना तपास करत असताना बादल हा त्याच्या गावी उत्तरप्रदेशला पळून गेल्याची खबर मिळाली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तेथे जाऊन बादलला अटक केले.

Hadapsar : प्रवासात ड्रायव्हरने चोरलेले 13 तोळे सोने मिळाले परत

यावेळी त्याच्याकडून 2 लाख 500 रोख रुपये व चोरीला गेलेले 6 तोळे 8 ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण 5 लाख 38 हजार रुपयांचा एवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी बादल याला न्यालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याचा पुढील तपास भारती विद्यापीठ (Katraj) पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.