Pune : मराठी साहित्यातील आघाडीच्या लेखिका कविता महाजन यांचे निधन

एमपीसी न्यूज – मराठी साहित्यातील सध्याच्या आघाडीच्या लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचे न्यूमोनिया आजारामुळे निधन झाले.  त्या 51 वर्षांच्या होत्या. त्यांना मराठी साहित्‍यातील अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्यात आले होते. 

कविता महाजन यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना 2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाई पुरस्कार, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहाला 2013  मध्ये गौरवण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.