BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी केदार भेगडे

उत्सव समिती घेणार पाच आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक

727
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ग्रामदैवत श्री.डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी केदार गोरख भेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने डोळसनाथ महाराज उत्सव समितीची बैठक शनिवार (दिनांक ९ मार्च) रोजी डोळसनाथ महाराजांच्या मंदिरात घेण्यात आली. बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखत याहीवेळी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वानुमते खालील कार्यकारणीची निवड सन २०१९-२०साठी करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील नामांकित उत्सवामध्ये तळेगाव दाभाडे येथील यात्रेची गणना होते. अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जातात. उत्सवांमध्ये छबिना पालखी, कुस्त्यांचा भव्य आखाडा, तमाशा,ऑर्केस्टा, भजन स्पर्धा, अशा प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,तसेच मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील पाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च डोळसनाथ महाराज उत्सव समिती करेल, अशी माहिती अध्यक्ष केदार भेगडे यांनी दिली.

  • नूतन कार्यकारणी : अध्यक्ष :- केदार गोरख भेगडे, खजिनदार :-अविष्कार अशोक (अंकल) भेगडे, सरचिटणीस :-प्रतिक विक्रम भेगडे. (पाटील). प्रसिद्धी प्रमुख :- शुभम आनंद काकडे, उपाध्यक्ष :- धनंजय टकले, अविष्कार भेगडे, आश्विन माने, राहुल भेगडे, सिद्धार्थ भेगडे, अभिजीत बोधे, निरंजन भेगडे, स्वप्नील शिंदे, मनोहर रायकर, राजू भाऊ टकले, प्रसाद भेगडे, सिद्धार्थ माने, चेतन कवडे. सहखजिनदार :- शुभम जाधव, माधव भेगडे, सागर सूर्यवंशी, चेतन भेगडे, सुरज भेगडे, आकाश जाधव, सौरभ भेगडे, अक्षय जोशी, हेमंत मेमाने, प्रतिक निखळ, अथर्व करणे, स्वप्निल गलांडे. चिटणीस :- यश लांजेकर, यश गायकवाड, अमेय बोरुडे, सुजित वाघोले, दिनेश हेंद्रे,विराज गदादे, दिपक काळाने, शुभम परदेशी, निरज भेगडे, प्रणव भेगडे, शुभम खोमणे, विघ्नेश पिल्ले, कार्तिक खेडेकर.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3