Kedar Shinde Supports Mumbai Police: कुणीही येतंय, टिकली वाजवून जातंय; केदार संतापला ट्रोलर्सवर

Kedar Shinde Supports Mumbai Police: angry over trolls आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस कामात दिरंगाई करत असल्याचं म्हणत अनेकांनी ताशेरे ओढले आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता सुमारे दीड महिन्यांचा काळ लोटला आहे. पण सध्या त्यात प्रचंड ट्विस्ट येत आहेत. आज एक आरोप, उद्या दुसरा असे करत करत त्यातील तथ्य काय आहे याचा विचार करुन सामान्य माणूस भंडावून गेला आहे. एकीकडे करोनामुळे सगळं आयुष्य ठप्प झाल्यासारखे झाले आहे. पण या आत्महत्या प्रकरणातील वावड्या काही संपत नाहीत.

आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस कामात दिरंगाई करत असल्याचं म्हणत अनेकांनी ताशेरे ओढले आहेत. अलीकडेच अभिनेत्री तनुश्री दत्तानेदेखील मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. परंतु, आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मुंबई पोलिसांना पाठिंबा देत आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे असं म्हटलं आहे.

आता बास्स झालं.. @MumbaiPolice. तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी negative बातम्या सुरू आहेत. कुणीही येतय आणि टिकली वाजवून जातय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या #SushantSinghRajputDeathCase प्रकरणाचा समारोप करा!!!! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे. @CMOMaharashtra, अशी पोस्ट केदार शिंदेने शेअर केली आहे.


खरंतर करोनाच्या संकटामुळे सध्या सगळेच चिंतेत आहेत. पण सुशांतच्या या आत्महत्येचा गुंता सुटण्याऐवजी आणखीनच वाढत जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.