kedar’s Letter To Dhoni : ‘अभी ना जाओ छोडकर की…’, केदार जाधवचं धोनीला भावनिक पत्र

'Don't leave now ...', Kedar Jadhav's emotional letter to Dhoni

एमपीसी न्यूज – केदार जाधवनं खूप उशीरा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र, धोनीने त्याला कायम साथ दिली. आज महेंद्रसिंग धोनीच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त केदारनं आपल्या व चाहत्यांच्या भावना प्रकट करणारे एक खास पत्र धोनीला लिहिलं आहे. या पत्रात केदारने धोनी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत धोनीला मोठ्या भावाची उपमा दिली आहे.

केदार जाधवनं या पत्रात, ‘क्रिकेट कसं खेळायचं यासोबत आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलत’, अशा भावना व्यक्त केल्या.

केदार जावधनं आपल्या पत्रात धोनीला ‘समुद्रातील लाइटहाऊस’ म्हटलं आहे. “ज्याप्रमाणे लाइटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं , दिशा दाखवताना उजेड देतं, लाटाही झेलतं, अगदी तुमच्यासारखं ! तुम्ही कित्येकांना आनंदाचे क्षण दिले, दिशा दाखवली, टीका होत असताना खंबीरपणे उभे राहिलात”, अशा भावना जाधवनं व्यक्त केल्या आहेत.

केदार जाधव पत्रात पुढे लिहतो, ‘तुम्ही स्टॅम्प मागून दिलेल्या टिप्स, पार्टनर शिप सगळंच डोळ्यासमोर उभं राहत. देशाला दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी रँकिंग मिळवून देणाऱ्या कॅप्टनला मी काय गिफ्ट द्यावं म्हणून मी पत्र लिहायचं ठरवलं’.

केदारने धोनी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत धोनीला मोठ्या भावाची उपमा दिली आहे.

केदार म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकासाठी काही ना काही तरी आहात, कुणासाठी मेंटॉर, कुणासाठी लीडर तर कुणासाठी आयडॉल. मला नेहमी तुम्ही सांगायचा की सतत प्रयत्न करत राहायला हवं. या जगात काहीच अवघड नाही मैदानावर सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा.

तुमच्यातला खेळाडू आणि देशभक्त आम्ही नेहमी पहिला आहे. तुम्हाला गेली पंधरा वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलं आहे पण अजूनही आमचं मन भरलं नाही’.

पत्राचा शेवट करताना केदार जाधवने मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या ‘अभि ना जाओ छोडकर… के दिल अभि भरा’ नही’, या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी लिहून धोनीला अजून काही दिवस क्रिकेट खेळण्याची एकप्रकारे विनंतीच केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.