Kedgaon Crime News : अवैध वाळू उपसा करणार्‍यां नऊ जणांवर गुन्हा दाखल; तीस लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन ट्रकसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल केला आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव येथील मुळा-मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या साह्याने हा बेकायदा वाळू उपसा सुरू होता.

पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या अमोल चौधरी, राजेंद्र गायकवाड, निखील माणिक मगर, अजिंक्य भाउसाहेब शेळके, आशिष शेळके यांच्यासह तसेच तीन ट्रक चालक व एक जेसीबी मशीन चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी केडगाव येथील मुळा-मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा करीत होते. याची माहिती यवत पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तत्काळ पोलीस कर्मचारांचे पथक घेऊन येथे छापा टाकला.

येथे ट्रक वाळू चोरी करताना पोलिसांना दिसले. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच ट्रक आणि जेसीबी मशीन जागीच ठेवून चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.