-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : मुख्यमंत्री साहेब ! पक्षाला कमी वेळ द्या, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या – सुप्रिया सुळे 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I
एमपीसी न्यूज – राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर महिलांवरील प्रश्नाकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांना पक्षाच्या प्रचारातून वेळ मिळत नाही. माझे मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पक्षाला कमी वेळ द्या आणि महिलांच्या सुरुक्षेकडे लक्ष द्यावे. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या समस्यांबाबत तसेच कात्रज ते खडकवासला मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर लवकरात लवकर करावा यासाठी आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे आणि आयुक्त सौरभ राव यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना अनेक विषयांवर त्यांनी भूमिका मांडली.
फर्ग्युसन महाविद्यालयात आज पूजा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असून तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या त्या स्वतःच्या घरी घाला. तसेच पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.