Pimpri : स्वकष्टाने कमवलेली संपत्ती जिवनाच्या अखेर पर्यंत आपल्याजवळच ठेवा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकांचे पिंपरी चिंचवड  शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपत्ती आपल्याजवळच ठेवावी, असा सल्लाही दिला.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे आज (रविवारी) ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, विधानसभा संघटक अनंत को-हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा महिला संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, नगरसेवक सचिन भोसले, नगरसेविका रेखा दर्शले, माजी नगरसेवक मधुकर बाबर, राम पात्रे, कामगार नेते जयसिंग पवार आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले,  जेष्ठ नागरिकांकडे अनुभवाची शिदोरी आहे. तुमचे मार्गदर्शन पिंपरी चिंचवडसाठी मोलाचे आहे. शहरातील विरंगुळ केंद्र हे जेष्ठ नागरिकांसाठी सुख-दुःखाची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण असुन वृद्धापकाळात अनेकांना मानसिक आधार हवा असतो अशा वेळी शिवसेना तुमच्या बरोबर असेल. ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपती कोणाच्या हाता मध्ये अथवा नावाने  करू नये आज परस्थिती बदली आहे. आई वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याची संख्या वाढत चालली आहे. ही समाजा साठी चिंतेची बाब असून आपण दिलेले संस्कार कमी पडत नसून पैश्याच्या मागे धावणारी प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे.प्रत्येक तरुण स्वत:चा  विचार करू लागला आहे  म्हणुनच आई वडीलांकडे लक्ष कमी होत असुन त्यातून वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे  यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सत्कार कऱण्यात आले. त्यात ज्येष्ठ नागरिक संघ गणेशनगर थेरगाव, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ थेरगाव, अशोक ज्येष्ठ नागरिक संघ थेरगावस रॉयल कोर्ट ज्येष्ठ नागरिक संघ, थेरगाव,आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, वाकड, गुरुदेव दत्त ज्येष्ठ नागरिक संघ वाकड, महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ शाहुनगर,सिध्दीविनायक ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर, ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी, जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ विद्यामंदिर, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ काळभोरनगर, ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडगाव, ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ चिंचवडगाव, काकडे पार्क  ज्येष्ठ नागरिक संघ, काकडे टाऊनशिप ज्येष्ठ नागरिक संघ, मोरया गोसावी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिक संघ,  चिंतामणी  ज्येष्ठ नागरिक संघ वाल्हेकरवाडी, दापोडी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण आदी ज्येष्ठ नागरिक संघाचा सत्कार यावेळी करण्यात आला.या प्रसंगी शहरप्रमुख योगेश बाबर यांनी स्वागत केले  तर जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, कामगार नेते जयसिंग पवार यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.