Kelgaon: बिबट्याच्या हल्ल्यात 1 शेळी ठार,दोन करडे पळवली

एमपीसी न्यूज -केळगाव येथील हनुमानवाडीतील ठाकर वस्ती पासून जवळ असणाऱ्या(Kelgaon) एका शेतात नागेश सतीश कोकरे ( धनकर) यांचे कुटूंब  शेळ्या ,मेंढ्या ( मेंढपाळाचा वाडा )गेल्या काही दिवसांपासून वसलेले आहे.आज दि.22 रोजी पहाटे बिबट्याने त्याठिकाणी एका शेळीवर हल्ला केला असून  शेळीची 2 पिल्ले (करडे)घेऊन तो पसार झाला आहे.
त्याच्या या हल्ल्यात  1शेळी ठार झाली आहे.बिबट्या ने त्या शेळीस फरफटत (Kelgaon)जवळील ओढ्यात नेऊन तिला मारून टाकले आहे.ती शेळी गरोदर असल्याचे यावेळी  कोकरे कुटुंबाने यावेळी सांगितले.तसेच दोन करडे( शेळीचे पिल्ले) पळवली आहेत . व तेथील एक कुत्रा नाहीसा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच वनविभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली आहे.व तिथे बिबट्याचे पंजाचे ठस्से  वनविभाग कर्मचाऱ्यास आढळून आले आहेत.असे  ही यावेळी कोकरे(धनकर )कुटुंबाने सांगितले.

राज्यातील सर्व पशूंची ईअर टॅगिंग ear tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक
करणे बाबत..महाराष्ट्र शासन , कृषी पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विभाग,शासन निर्णय (जीआर) आलेला आहे.

त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.असे नमूद केले आहे.
या जीआर विषयी वनरक्षक यांनी कोकरे कुटुंबाला यावेळी माहिती दिली .

Pimpri : 2019 मधील मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येणार – श्रीरंग बारणे

सर्व पशूंची ईअर टॅगिंग (कानावर बिल्ला असणे)या नवीन शासन निर्णय बाबत काहीही माहिती नसल्याचे यावेळी कोकरे कुटुंबाने सांगितले.एक  गरोदर शेळी बिबट्याने ठार केली असून दोन करडे ही नेली.यामुळे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई शासनाकडून मिळावी .अशी मागणी यावेळी त्यांनी केली. भरपाई मिळावी म्हणून संबंधित वनविभाग व  इतर विभाग याकडे अर्ज करणार आहोत असे कोकरे कुटुंबाने यावेळी सांगितले आहे.
जिल्हा परिषद पुणे ,पंचायत समिती खेड पशुसंवर्धन विभाग (स्थानिकस्तर) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1/ आळंदी येथील पशुधन विकास अधिकारी यांनी यावेळी सांगितले की ,ज्यांची पशूंची ईअर टॅगिंग राहिलेली असेल त्यांनी आपल्या आपल्या विभागात( रहिवासी असेलल्या संबंधित विभागात)
करून घ्यावी.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.