Keral : तृप्ती देसाई यांना केरळ येथे विमानतळावरच रोखले !

एमपीसी न्यूज- केरळ येथील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी केरळ येथे दाखल झालेल्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना आज विमानतळावरच रोखण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास हिंदुत्ववाद्यांकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मंदिर खुले करण्यात येणार आहे. त्यावेळी विरोध मोडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई करणार आहेत. त्यासाठी आज त्या केरळ येथे दाखल झाल्या असता त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.