Maval : केतकी बाळसराफ यांनी मिळविला तालुक्यातील पहिली महिला MDS होण्याचा मान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या पदव्युत्तर दंतचिकित्सा अभ्यासक्रम (M.D.S.) या परीक्षेत केतकी बाळसराफ यांनी प्रथम क्रमांक मिळवून मावळ तालुक्यातील पहिली M.D.S. महिला असल्याचा मान मिळविला आहे.

सिंहगड डेंटल कॉलेज व हॉस्पिटल या दंत महाविद्यालयात प्रोस्तोडोंटिक्स या विभागातही त्या प्रथम आल्या आहेत. डॉ. केतकी यांनी कवळी बसविणे व स्क्रूच्या सहाय्याने नवीन दाताचे रोपण करणे यात प्राविण्य मिळविले आहे. या परीक्षेतील यशानंतर डॉ. केतकी यांची सिंहगड डेंटल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आपल्या या यशाचे महत्व त्यांनी वडील डॉ. दत्तात्रय बाळसराफ, आई स्नेहल बाळसराफ, भाऊ आणि डॉ. ऐश्वर्या यांना दिले आहे. कौटुंबिक वारसा मिळाल्यामुळेच शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. असे सांगत त्यांनी सासरकडच्या मंडळींनीही सतत प्रोत्साहन दिल्याचे नमूद केले. सासरे रामचंद्र नाळे, सासू शोभा नाळे, पती डॉ. संकेत नाळे यांनी प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. केतकी यांच्या यशाबद्दल सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. एम.एन. नवले, डॉ. सुनंदा नवले, डॉ. जयंत पळसकर, डॉ. जयप्रकाश गिरमे, डॉ. कृष्णकांत वाढोकर , पत्रकार सुदेश गिरमे आदींनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.