KFC Fraud : केएफसीची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – केएफसी (KFC Fraud) रेस्टॉरंटची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एकाची नऊ लाख 31 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 14 जून ते 18 जुलै या कालावधीत सारस्वत बँक, आकुर्डी येथे घडला आहे.

प्रशांत नंदकिशोर गुंजोटे (वय 37, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  [email protected] या मेलचा वापरकर्ता, बँक खाते धारक, आदित्य अगरवाल, सुमित (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना केएफसी रेस्टॉरंटची फ्रेंचाइजी घ्यायची असल्याने त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता. त्यानंतर कागदपत्रांची यादीसह फॉर्म भरून [email protected] या मेल आयडीवर मेल पाठवला. त्यांचा फॉर्म ऍड्रेस नॉट फाऊंड या शे-याने रिजेक्ट झाला. त्यानंतर एका व्यक्तीने मेसेज करून फिर्यादी यांना पुन्हा फॉर्म पाठवण्यास सांगितला.

Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील पीडितेला न्याय देण्यासाठी मनसे तिच्या कुटुंबियांसोबत सदैव भक्कमपणे उभी राहील

राहुल शिंदे या व्यक्तीने फिर्यादींना लेटर (KFC Fraud) ऑफ इन्टेन्ट पाठवले. राहुल अगरवाल याने रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 24 तासात एक लाख 55 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींनी ती रक्कम भरली. त्यांनतर एनओसी घेण्यासाठी सात लाख 75 हजार 500 रुपये मागितले. फिर्यादीने ती रक्कमही बँक खात्यावर जमा केली. त्यानंतर फिर्यादींना लायसन्ससाठी 19 लाख 75 हजार रुपयांची मागणी झाली. याचा फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली. मात्र त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन आरोपींनी भेटणे टाळले. तसेच फिर्यादीची नऊ लाख 31 हजार रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.