_MPC_DIR_MPU_III

Khadki : खडकीबाजार-मनपा 116 क्रमांकाची बस बंद; विद्यार्थी, कामगारांचे हाल

एमपीसी न्यूज – खडकी येथील खडकी बाजार परिसर ते मनपा या मार्गावर नियमितपणे सुरू असलेली 116 क्रमांकाची पीएमपीएमएल बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी खडकी परिसरातील विद्यार्थी, कामगार, दैनंदिन
प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद केलेली 116 क्रमांकाची पीएमपीएमएल बस पुन्हा सुरु करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख राम जाधव यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

खडकी परिसरात वीस हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असून, पीएमपीएमएलच्या वतीने खडकी बाजार-रेंजहिल कॉर्नर-चतु:शृंगी-मनपा या मार्गावर 116 क्रमांकाची बस सुरु होती. यामुळे परिसरातील विद्यार्थी, ऍम्युनेशन फॅक्टरी वसाहतीतील कामगार, पेन्शनसाठी बँकेत जाणारे ज्येष्ठ नागरिक व दैनंदिन प्रवाशांची सोय होत होती. मात्र, अचानक पीएमपीएमएलच्या वतीने या मार्गावर धावणारी 116 क्रमांकाची बस बंद केल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. पुण्यात जाण्यासाठी किंवा खडकी परिसरात येण्यासाठी 116 क्रमांकाची बस सोयीची होती. या मार्गावरून धावणाऱ्या या बसमुळे
प्रवाशांचा वेळ व पैसाही वाचत होता.

_MPC_DIR_MPU_II

सध्या बोपोडी मार्गे म्हणजे लांबच्या मार्गावर बस सुरू असून, यामुळे खडकी बाजारा येथील लाल बहादुर शास्त्री शाळा, आलेगावकर स्कुल, टिकाराम महाविद्यालय, एस.व्ही.एस. स्कूल, ऑलसेंट स्कूल, तसेच रेंजहिल्स येथून शिवाजीनगर येथे न्यू इंग्लीश स्कूल, मॉडर्न हायस्कूल, फर्ग्यूसन महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय, ब्रुहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ
कॉमर्स, विद्याभवन स्कूल या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, कामगारांना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. तसेच वेळही खूप जातो आणि आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे, असे रामभाऊ जाधव यांनी सांगितले.

पूर्वीपासून नियमितपणे सुरू असलेली 116 क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करून विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी पीएमपीएमएल प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून राम  जाधव यांनी केली आहे.दरम्यान, पीएमपीएमएलचे व्यवस्थापक सुनील गवळी यांनी बसची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.