
Khadakwasala : कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून तीन तरुण बेपत्ता


एमपीसी न्यूज – बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून कारमधील तीन तरुण वाहून गेले.

निखिल दिनेश चव्हाण (वय 21 राहणार संतोष नगर कात्रज पुणे), साईनाथ उर्फ गणेश तुकाराम शिंदे (वय 22 राहणार संतोष नगर कात्रज), सुरज उर्फ बाबू संदीप वाडकर (वय 20 राहणार संतोष नगर कात्रज) अशी बेपत्ता झालेल्या युवकांची नावे आहेत.
वॅग्नर कार (एम एच 12 क्यू डब्ल्यू 16 21) मधून हे तीन युवक जात असताना कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅगनर कार वाहून गेली. सदरची वॅगनर कार ही नाल्यात सापडून आली असून बेपत्ता मुलांचा शोध भारती विद्यापीठ पोलीस व आपत्ती व्यवस्थापनची टीम मिळून करीत आहेत.
