रविवार, जानेवारी 29, 2023

Khadakwasla News : प्रेम विवाह केलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडकवासला (Khadakwasla News) परिसरात एका बावीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या तरुणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. प्रांजल किसन रासकर (वय 22, सध्या रा. खडकवासला, मूळ रा. पिंपळनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप समोर आले नाही. हवेली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी प्रांजलने कुटुंबीयांचा विरोध डावलून आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दरम्यान, प्रांजलचा पती रात्री उशीरा कामावरुन घरी आला. पतीने घराचा दरवाजा वाजविला. पण, तिने प्रतिसाद दिला नाही. त्याने घरमालकाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता त्त्यांना प्रांजलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रांजलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे आढळून आले.

तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले (Khadakwasla News) नाही. प्रांजलच्या नातेवाईकांच्या जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News : वेळेचे उल्लंघन करत डीजे वाजवल्याप्रकरणी कोरा कॉकटेल बारच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

Latest news
Related news