Pune : खडी मशीन चौकात विचित्र अपघात; चार गाड्या एकमेकांवर धडकल्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशीन चौकाजवऴ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये चार – पाच गाड्या एकमेकांवर जाउन धडकल्या. यामध्ये किरकोळ जखमी असून, कोणतीही जिवीत हानी झाली नाही अशी माहिती पोलीसांनी दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कात्रज कोंढव्या रस्त्यावरील खडी मशीन चौकाजवळून स्टील ने भरलेल्या एका कंटेनरने समोरून जाणा-या चार वाहनांना धडक दिली . या अपघातामुळे घाबरलेल्या एका कार चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने चार वाहने एकमेकांवर आदळली. अचानक झालेल्या या अपघाताने कारमधील प्रवाशी पुरते घाबरले होते. या अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघातानंतर चालक कंटेनर सोडून सोडून फरार झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.