Khadki: आठ महिन्यांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक

Khadki: Accused of absconding for eight months arrested पिल्ले हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

एमपीसी न्यूज- चोरी, दरोडा यासह विविध गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.

सुरेश पिल्ले (रा. नाजरेत वाडा, खडकी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील 8 महिन्यांपासून तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पिल्ले हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रविवारी (दि.14) कोम्बिंग ऑपरेशन करत राहत्या घरातून त्याला अटक केली. त्याच्यावर इतर पाच गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता दि. 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1