Khadki Crime News : हिमाचल प्रदेशातून पुण्यात आणलेले 11 लाखांचे चरस जप्त

एमपीसीन्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे -नाशिक महामार्गावरून हिमाचल प्रदेश येथून कुटुंबासह कारने फिरावयास आल्याचे भासवून चरस या अंमली पदार्थाची डिलिव्हीरी देण्याकरिता आलेल्या एका तरुणास गुन्हे शाखेच्या खंडणी विराेधी पथकाने सापळा रचून अटक केली.

या कारवाईदरम्यान पाेलीसांनी आराेपीच्या ताब्यातून 11 लाख 43 हजार रुपये किंमतीचा एक किलाे 905 ग्रॅम चरस तसेच पाच लाख रुपये किंमतीची महिंद्रा एक्सयुव्ही कार आणि दाेन माेबाईल फाेन, असा 16 लाख 53 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

विरेंद्र घांथुराम शर्मा (वय-40,रा.मनाली, जि.कुल्लु, हिमाचल प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खंडणी विराेधी पथकाचे पाेलीस कर्मचारी प्रदीप गाडे यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, हिमाचल प्रदेश येथून चरस घेऊन एक इसम कारने पुण्यात येत आहे. त्यानुसार पाेलीसांनी पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून आराेपीच्या कारची खातरजमा करुन जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी येथे संबंधित कार ताब्यात घेतली.

कार चालकाकडे चाैकशी केली असता त्याने कारमध्ये अंमली पदार्थ नसल्याचे सांगितले. परंतु पाेलीसांनी कारची झडती घेतली असता सुरुवातीला काही मिळून आले नाही.

मात्र, पाेलीसांनी मेकॅनिकच्या मदतीने कारमधील सर्व भागांची तपासणी केली. त्यामध्ये मागील दरवाज्याच्या वरील बाजूच्या टफच्या कुशनमध्ये निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत गुंडाळलेला काळपट रंगाचा एक किलाे 905 ग्रॅम चरस मिळून आला.

पाेलीसांनी याप्रकरणी आराेपीवर खडकी पाेलीस ठाण्यात एनडीपीसी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.