Khadki Crime News : खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षाने केली तरूणाला मारहाण

एमपीसी न्यूज – घराशेजारी सुरू असलेल्या बांधकामाला विरोध करण्याच्या कारणावरून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षांनी तरूणाला मारहाण केली. याप्रकरणी खडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शिंदे (वय ३८ रा. गवळीवाडा) यांना मारहाण करण्यात आली आहे.

खडकी बोर्डाच्या उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर यांनी नितीन शिंदे यांना कार्यालयात बोलावले होते. कार्यालयात गेले असताना दालनामध्ये बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सध्याचे सदस्य दुर्योधन भापकर (रा. खडकी) बसले होते. शिंदे यांच्या घराजवळ डॉ. मुलाणी यांनी क्लिनिकमध्ये डागडुजी सुरू केली आहे. त्यांच्या क्लिनिकच्या बांधकामाला विरोध केला जात असल्याचे माजी उपाध्यक्ष भापकर यांचे म्हणणे असल्याचे हिवरकर यांनी शिंदेना सांगितले. मात्र शिंदेनी याबाबत कोणत्याही प्रकारचा विरोध नसल्याचे हिवरकर यांना सांगितले.

त्यानंतर भापकर यांनी नितीन शिंदेला शिवीगाळ करीत हाताने मारहाण करत खुर्ची उचलून डोक्यामध्ये मारली. शिंदे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून भापकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.