Khadki : संशयातून आईचा गळा चिरून केला खून , मुलाला शिर्डी येथून अटक

एमपीसी न्यूज – घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून ( Khadki ) मुलाने आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात शनिवारी (दि.10) रात्री घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला खडकी पोलिसांनी रविवारी (दि.11) सायंकाळी शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले.

गुंफाबाई शंकर पवार (वय 55, मूळ रा. मुठे वडगाव, श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय 35, रा. रेंजहिल्स क्वार्टर्स, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून आणि नैराश्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Junnar : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर पवार हा खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये टेलिकम्युनिकेशन विभागात तंत्रज्ञ आहे. त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचा संशय त्याला होता.

त्याने मुठे वडगाव गावातून आईला बोलावून घेतले. आई मुलाच्या प्रेमापोटी मुलाकडे रेंजहिल्स येथील घरी आली. परंतु शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरून खून ( Khadki ) केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.