Khadki News : खडकीतील डंक्कन रस्त्याच्या कडेला सापडले पाच महिन्यांचे अर्भक

एमपीसी न्यूज – खडकीतील मेथॅलिक चर्चच्या जवळ डंक्कन रस्त्याच्या कडेला पाच महिन्यांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. बुधवारी (दि.6) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे अर्भक आढळून आले.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विवेक बसनगार यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील मेथॅलिक चर्चच्या जवळ डंक्कन रस्त्याच्या कडेला बुधवारी (दि.6) सकाळी साडेसहाच्या सुमारास चार ते पाच महिन्यांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले.

अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले असावे व बाळाचा जन्म लपवण्यासाठी ते टाकून दिले असावे असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पुढील उपचारासाठी बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.