Khadki Potholes : खडकी येथील रस्त्यांवरील खड्डे 8 दिवसात नं बुजवल्यास मनसेचा मेट्रो विरोधात आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज : खडकीतील रस्त्यांवरील खड्डे मेट्रोने 8 दिवसात बुजवावेत अन्यथा (Khadki Potholes) मनसे मेट्रोच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

विजय बेल्हेकर, अध्यक्ष, खडकी कॅन्टोन्मेंट विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी सांगितले की, महा मेट्रोच्या वतीने पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्गीकेचे काम पुणे मुंबई हायवेवर बोपोडी व खडकी येथे चालू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबई- पुणे हायवे वरून येणारी वाहतूक ही खडकी बाजार मार्गे वळविण्यात आली आहे. ही वाहतूक बोपोडीतून येऊन खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरून एमएसईबी ऑफिस पर्यंत जाते व तिथून खडकी रेल्वे स्टेशनला जाते.

यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड व इतर रोडवर वाहतुकीचा ताण खूप वाढलेला आहे. या रोडवर सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात व वाहतूक कोंडी होते. या सर्व रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो.(Khadki Potholes) त्यामुळे बुधवारी महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना फुगेवाडी येथील ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आले. महामेट्रो ने पुढील आठ दिवसात खडकीतील सर्व खड्डे डांबरीकरण करून बुजवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खडकी विभागाच्या वतीने मेट्रोच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.

Sports meeting : शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तालुकानिहाय बैठकीचे आयोजन

गुरुद्वारासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर, एम एस सी बी ऑफिसच्या मागील बाजूस, ऑल सेंड हायस्कूल चौक, अम्मुनिशन फॅक्टरी दवाखाना, (Khadki Potholes) खडकी पोलीस स्टेशन जवळील बोगदा व बीएसएनएल ऑफिस मागील रोड वर असलेले खड्डे डांबरीकरण करून  करून बुजवावेत. बेल्हेकर, ज्ञानेश्वर कोळेकर, विल्सन अंथनी व अक्षय कुटे यांनी हे निवेदन महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.