Khadki: ‘सैनिकहो’ तुमच्यासाठी, सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे

एमपीसी न्यूज – ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील जयहिंद फाऊंडेशन आणि अस्तित्व समाज विकास संस्था चिंचवड, पुणे यांच्या वतीने खडकीतील सैनिकांसमवेत रक्षाबंधन साजरे केले.

खडकीतील लष्कराच्या सीटीएस आणि एचआरडीसी सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास कर्नल एस. बी. यादव, मेजर जी एस राव, संजय कुमार त्यागी, अध्यक्षा वंदना मांढरे, सचिव आशा पाटील, सदस्य मंगल जगताप, शोभा मांढरे, सुजाता चिंचवडे, निवेदिता वाल्हेकर, कोमल नवले, मनीषा रंधावणे, अंजली देशमुख, सोनाली जंजाळ, कल्पना जाधव, कविता मोरे, ज्योती पवार, मंजुषा पाटील, अंजली काळे, लता कांचन, उमेश कोळी, सनी नायर ,वतन वाल्हेकर, साद शेख, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाल्या, ‘‘जे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्यांना राखी बांधण्याचा हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. जेव्हा सैनिक त्यांच्या घरापासून दूर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असतो तेव्हा त्यांच्या कुटूंबियासोबत जयहिंद संस्था आहे. विश्वास सैनिकांच्या मनात निर्माण होत आहे.’’

यावेळी महिलांनी सैनिकांना ओवाळून राखी बांधून पेढा भरवला. रुमाल व पुस्तक भेट म्हणून दिले. निरोप घेताना भारतातील विविध भागांतील असलेल्या या सैनिक बंधूनी सर्वांना खूप प्रेमाने ओवळणीची भेटवस्तूही दिली. यावेळी ‘‘आम्ही आमच्या कुटूंबात असल्यासारखे वाटले. भावनिक कार्यक्रम प्रथमच होत आहे. कुटूंबापासून खूप दूर असल्यामुळे तुम्हांला भेटून बहीणच भेटल्याचा आनंद होत आहे, अशा भावना सैनिकांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.