गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Khadki Rape Case : Instagramवर अर्धनग्न फोटो टाकण्याची धमकी देऊन बलात्कार

एमपीसी न्यूज : एका वीस वर्षीय (Khadki Rape Case) तरुणाने 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार महादू डेंगळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 2020 ते 2022 या कालावधीत घडली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पीडित मुलीची ओळख (Khadki Rape Case) होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. सातत्याने हा प्रकार होत असल्याने पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Mission Baramati : भाई भतीजा वाद अन् त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म; बारामतीत निर्मला सीतारामन यांची पवारांवर टीका

spot_img
Latest news
Related news