Khalapur : द्रुतगतीमार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने दोन जणांचा मृत्यु; तिघे जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री किलोमीटर 38 च्या दरम्यान झाला.

पुढच्या सीटवर बसलेले मोतीराम मोतीवाले (वय – 70) व मागील सीटवर बसलेल्या उषा मोतीवाले (वय 65 दोघेही राहणार चकाला अंधेरी) यांच्या शरिरात क्रॅश बॅरियर घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला तर मोतीराम यांच्या मांडीवर बसलेली त्यांची नात शान (वय 2), मागील सिटवर बसलेली त्यांची सून मोहिनी मोतीवाले (वय 30), व नात खुशी (वय 15) हे जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी चकाला येथे राहणारे मोतीवाले कुटुंब धार्मिक विधीसाठी कोंढणपूर येथे गेले होते. ते धार्मिक विधी आटोपून पुणे येथून ओला कार (MH 11 CH 159) बुक करून अंधेरीला परतत असताना हा अपघात झाला. या अपघातातून आश्चर्यकारक रीतीने वाचलेल्या किरण जीवन गुरसुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला डुलकी लागली असावी आणि प्रथम दर्शनी देखील तसेच आढळून आले कि मीडियन मध्ये घुसून अगदी डाव्या बाजूने क्रॅश बॅरियर घुसलेला आहे.

मात्र चालकाच्या म्हणण्यानुसार सीट बेल्ट लावला होता मात्र एअर बॅग ओपन नाही झाली. या बाबतीतली पुढील चौकशी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग किसवे करीत आहेत.

अपघातानंतर त्वरित देवदूत यंत्रणा अपघातस्थळी दाखल होऊन बचाव कार्याला सुरुवात केली. रोडवेज पेट्रोलिंग, बोरघाट पोलीस टीम, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा यांनी तातडीने हालचाल करून जखमींना उपचारासाठी पुढे रवाना केले. अपघात टीमचे गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, धर्मेंद्र रावळ, रवी पाटील यासिन शेख अमित गुजरे हे मदतीला होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.