Khalapur : खालापुर टोलनाक्याजवळ कार जळून खाक

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापुर टोलनाक्याजवळ कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. या कारमध्ये चारजण प्रवास करीत होते. गाडीने पेट घेताच ते तात्काळ गाडीतून बाहेर निघाल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी कार ही खालापुर टोलनाका ओलांडून पुढे आल्यानंतर अचानक कारने (एम एच ४३ ३०६०) पेट घेतला. या गाडीतील चारही प्रवासी प्रसंगावधान राखत खाली उतरल्याने कोणतीही जिवितहानी झाली. गाडी पेटल्याची माहिती समजताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र तो पर्यत कार जळून खाक झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.